भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें

kan majha visar padila mayabap | sandiyeli krupa konya gunen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥ कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥२॥ तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥३॥