भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं

kan ji majhe jivin | alas thevila gosavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥१॥ येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥ देहआत्म वादी । केला घात कुबुद्धी ॥२॥ तुका म्हणे मन । कळवटी वाटे सीण ॥३॥