भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां हो वाढवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोड्याचें

kan ho vadhavitan deva | maj ghari samajava | kevada ho gova | phar kelen thodyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां हो वाढवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोड्याचें ॥१॥ ठेविन पायांवरी डोईं । यासी तुमचें वेचे काईं । झालों उतराईं । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥ निवाड आपणियांपाशीं । असोनकांव्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥२॥ तुका म्हणे गोड । होतें झालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडी च वाढेल ॥३॥