भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया

kan ho ethen kal ala amhan ad | tumhampashin nad karavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥१॥ कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥ कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥२॥ पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥३॥ काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥४॥ तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥५॥