भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा

kam nahin kam nahin | jalon pahin rikama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा ॥१॥ फावल्या त्या करूं चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥ध्रु.॥ नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें विव्हळतसे ॥२॥ एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥३॥