भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें दिसते सुनीळ तेजगे मज

kalpadrumatalin brahma punjalalen kaisen disate sunil tejage maj

कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें दिसते सुनीळ तेजगे मज । पाहातां वेणु वेदध्वनि नाद उमटताती सहजगे बाई ये ॥१॥ आनंदे गोपाळ गोधनें राखसी तळे यमुनेच्या पाबळीं । कर्मकाठी करीं घेउनियां वळत्या देतुसे पांचचा मेळिगे बाइये ॥ध्रु०॥ ऐसा जिकडे तिकडे उभारुनि बाहो । हाणतो थोरें निकोपें तयाचिया कर्मा होतिसे निवृत्ति । काय पुर्विल येवढें तपगे बाइये ॥२॥ गोवळेपणाचेनि वेषें अमरीं सेविजे बोलताति सवंगडे । येरुनि येराचिया उच्छिष्ठा झोंबती नेणो तया काय जोडेगे बाइये ॥३॥ मुनिजनां स्तवितां संतोष न पवे तो हुमलि घेतां हांसे । ब्रह्मादिकां बोलाचीं अक्षरें कोण जाणे प्रेम कैसेंगे बाइये ॥४॥ ऐसा साहिदर्शनां वर्णितां पवाडु नाहीं आणि गोवळेपणें वेष नवल सांगो मी कायी । बापरखुमादेविवर विठ्ठल सेविलिया । वांचूनि नेणवे केलिया कांहीगे बाइये ॥५॥