भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज

kalon naye ton chi chukavitan baren | mag pathamoren kay kaj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥१॥ धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ध्रु.॥ होतासी अंतरें झाकिलिया डोळीं । तोचि मी हा न्याहाळीं धरुनी दृष्टी ॥२॥ तुका म्हणे तुज रडीची च खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ॥३॥