भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसणें

kalon alen tujhen jinen | deva tun majhen posanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसणें ॥१॥ वाट पाहासी आमुची । सत्ता सतत कईची ॥ध्रु.॥ बोलावितां यावें रूपा । सदा निर्गुणीं चि लपा ॥२॥ तुका म्हणे तूं परदेशी । येथें आम्हां अंगे जिसी ॥३॥