भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आटकेली

kalon ala bhav majha maj deva | vanyanvin jiva atakeli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आटकेली ॥१॥ जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे शेवटीं हातीं कांहीं ॥ध्रु.॥ देव जोडे म्हणोन सांगतसे लोका । माझा मीच देखा दुःख पावे ॥२॥ तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥