भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवें काज काय माझें

kalel hen taisen gain mi tuj | janasaven kaj kay majhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥ करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥ होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥२॥ काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥३॥ तुका म्हणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥