भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना

kalatonda suna | bhalaten choruni kari jana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥१॥ धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥ मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥२॥ तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित॥३॥