भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळां पैं गोवळु काळासि आलोट

kalan pain govalu kalasi alot

काळां पैं गोवळु काळासि आलोट । नामामृतें पाठ भक्ता देहीं ॥ नित्य सुखा आह्मां तपांचिया कोडीं । न लागती परवडी व्रतें तीर्थे ॥१॥ सुलभ सोपारा सर्वाघटीं अससी । साधुसंगें दिससी आम्हा रया ॥२॥ चैतन्याशेजारीं मन पैं मुरालें । सावळें सानुलें ह्रदयघटीं ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलराज । निवृत्तीनें बीज सांगितलें ॥३॥