भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां

kalalen majha tuj navhe re athav | kay kaj jiv thevun atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥ तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता झालें जिणें ॥ध्रु.॥ पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥ आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठुर झालासी तूं ॥३॥ तुका म्हणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥४॥