भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं

kalacha vital jivashiva angin | bandhalase jagin drudh ganthin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥ विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥ सुखासी विटाळ दु:खासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥ विटाळाचे अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥