भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळा पुरुष तो हा गगनांत जो नांदे

kala purush to ha gaganant jo nande

काळा पुरुष तो हा गगनांत जो नांदे । अनुभवाच्या भेदें भेदला जो ॥१॥ भेदून अभेद अभेदूनी भेद । सच्चिदानंद जेथ नाहीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे तेथें अक्षय राहिला । आत्मा म्यां पाहिला या दृष्टिसी ॥३॥