भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळा लपंडाई काळेरात्री खेळे

kala lapandai kaleratri khele

काळा लपंडाई काळेरात्री खेळे । मी स्वसवें वेधली जाय काळ्याछंदें ॥१॥ काळेंनिळें हें अभ्र भासलें । ऐसे रुप देखिलें निर्गुणाचें ॥२॥ ऐसा हा सांवळा माझिये दृष्टी माल्हाथिला । ऊजरुनि गेला हा विठ्ठलुगे माये ॥३॥ ऐसे भुलविलें जाण काळेपणें आपणे । रखुमादेविवरु जाणे येर कांही नेणें ॥४॥