भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळा च सारिखीं वाहाती नक्षत्रें । करितां दुसरें फळ नाहीं

kala cha sarikhin vahati nakshatren | karitan dusaren phal nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळा च सारिखीं वाहाती नक्षत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥ ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें ॥ध्रु.॥ शीतउष्णकाळीं मेघ वरुषावे । वरुषतां वाव होय शीण ॥२॥ तुका म्हणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणें तया ॥३॥