भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळ जवळचि उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां

kal javalachi ubha nenan | ghali jhampadi khunti kanan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळ जवळचि उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥ कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥ काळ जवळिच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥२॥ काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥३॥ काळ भोंवताला भोंवे । राम येऊं नेदी जिव्हे ॥४॥ तुका म्हणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥५॥