भजनी मालिका
← भजनांकडे परत

काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां

kakulati yeto hari | kshanabhari nivaditan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥१॥ तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥ आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥३॥