भजनी मालिका
← भजनांकडे परत

काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें

kakhe kadasan ad pade | khadabad khadabade husakalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥ दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥ अवघा झाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥ हरीदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥ दोहीं ठायीं फजीत झालें । पारणें केलें अवकळा ॥४॥ तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जेणे ॥५॥