भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसा या लोभें गोवियेला । हा तो आपैसाचि राहिला

kaisa ya lobhen goviyela | ha to apaisachi rahila

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कैसा या लोभें गोवियेला । हा तो आपैसाचि राहिला ॥१॥ मज तो वाटे चोज याचे । खातां खादलें खाय साचें ॥२॥ ऐसी काय तुझी भीड । पडली ते न कळे गूढ ॥३॥ चोखा म्हणे भुलवण्या । धन्य नामया शाहाण्या ॥४॥