भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां

jyanchya sangen hoton padilon bhovanin | te keli dhovani jhaduniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥ आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजियाचा ॥ध्रु.॥ प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अविचित ॥२॥ तुका म्हणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥३॥