भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन

jyachen jaya dhyan | ten chi hoy tyachen man

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥ म्हणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥ सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥ तुका म्हणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥३॥