भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार

johar mayabap johar | tumachya maharacha mi mahar

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥ बहु भुकेला जाहलों । तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥ बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥ चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥