भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर

johar ji mayabap johar | sara sadhavaya alon vesakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥ फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥ आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥ तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥४॥