भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी

jodoniyan dhan uttam vevharen | udas vicharen vech kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥ उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥ परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥२॥ भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥४॥ तुका म्हणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥