भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडिले अंजुळ । असें दानउताविळ

jodile anjul | asen danautavil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोडिले अंजुळ । असें दानउताविळ ॥१॥ पाहा पाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥ध्रु.॥ तूं स्वामी मी सेवक । आइक्य तो एका एक ॥२॥ करितों विनंती । तुका सन्मुख पुढती ॥३॥