भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडी कोणांसाटीं । एवढी करितोसी आटी

jodi konansatin | evadhi karitosi ati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोडी कोणांसाटीं । एवढी करितोसी आटी ॥१॥ जरी हें आम्हां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥ध्रु.॥ करूनि जतन। कोणा देसील हें धन ॥२॥ आमचे तळमळे । तुझें होइऩल वाटोळें ॥३॥ घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥४॥ तुका म्हणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥५॥