भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट

jivensatin yatnabhav | tyachi nav balakat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥१॥ पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥ विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥२॥ तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥