भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें

jen ka ranjalen ganjalen | tyasi mhane jo apulen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥ तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥५॥