भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें

jen jen kanhi kariton deva | ten ten seva samarpen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥ आम्ही दुजें नेणों कोणा । हें चि मना मन साक्ष ॥२॥ तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥३॥