भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा

je keli ali te avaghi geli vanyan | urala pandhariraya shram majha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥ आभास ही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥२॥ आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥ तुका म्हणे आतां नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥४॥