भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं

jayasi navade vaishnavancha sang | janava to mang janmantarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥ अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥ मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा ॥२॥ तुका म्हणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥