भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयांचियासाठीं जातो वनाप्रती । ते तों सांगाती येती बळें

jayanchiyasathin jato vanaprati | te ton sangati yeti balen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जयांचियासाठीं जातो वनाप्रती । ते तों सांगाती येती बळें ॥१॥ जयांचियासाठीं टाकिला संसार । ते तों बलवत्तर पाठीं येती ॥२॥ जयाचिया भेणें घेतिलें कपाट । तो तेणें वाट निरोधिली ॥३॥ जयाचिया भेणें त्यागियेलें जग । तो तेणें उद्योग लावियेला ॥४॥ चोखा म्हणे नको होऊं परदेशी । चिंतीं विठोबासी ह्रदयामाजी ॥५॥