भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले

jayachiye dvarin sonyacha pimpal | angin aisen bal reda bole

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥ करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥ जया हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥ तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥३॥