भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं

jaya je vasana taya ti bhavana | hotase jana adi antin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥ कामाचे विलग आवरावें चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥ ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखें ॥३॥ चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥