भजनी मालिका
← भजनांकडे परत

जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत

javali nahin chitta | kay mandiyelen pret

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥१॥ कैसा पाहे चंद्रिदृष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥ कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥२॥ त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥३॥