भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी

jato varanasi | niravi gai ghode mhaisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥ गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥ नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥ भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥ सांगा जेवाया ब्राम्हण । तरी कापा माझी मान ॥४॥ वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥ तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा माझे लोणी ॥६॥ नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥७॥ तुका म्हणे नष्ट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥