भजनी मालिका
← भजनांकडे परत

जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें

jatan kara re jatan kara | ghalun pahe gharavari ghala choraten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥१॥ अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥ध्रु.॥ सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं तळमळ उरे ॥२॥ तुका म्हणे आह्मी करूं आपलें जतन । न लगे कांहीं कोणां घावें उघडा रे कान ॥३॥