भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरी मी नव्हतों पतित देवा । तरि तूं पावन कैंचा येथ

jari mi navhaton patit deva | tari tun pavan kaincha yeth

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जरी मी नव्हतों पतित देवा । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥ म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥ लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥ तुका म्हणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥३॥