भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें

jari he ad yati laj | kaisen kaj sadhaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥१॥ कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥ समर्पीला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥२॥ तुका म्हणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥३॥