भजनी मालिका
← भजनांकडे परत

जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनियां

japachen nimitta jhopecha pasar | dehacha visaru paduniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥ ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥ सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥ तुका म्हणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आम्ही ॥३॥