भजनी मालिका
← भजनांकडे परत

जप करितां राग । आला जवळी तो मांग

jap karitan rag | ala javali to mang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥ नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥ कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥ तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥