भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंववरी जाड नव्हे उजाड नाहीं

janvavari jad navhe ujad nahin

जंववरी जाड नव्हे उजाड नाहीं काढावया प्राण । मग मूढा पडसी संसार सांकडा । कांहीं कटी आपुला उवेडा रया ॥१॥ जाडरे जाडरे सेवटीचा धंदा । पडियेलेंसि भवकुंडा । एकीकडे जन्म एकीकडे मरण न निमेचि धंदा कुवाडा रया ॥२॥ थिल्लरीचें जळ मपितरे मिना जंव न तपे आतपु हा परिमळु । जंव हा आयुष्य वोघू न सरे तंव ठाकी अगाधु । पुढें आहे हाल कल्लोळु रया ॥३॥ भाड्याचे घर किती वाढविसी रे गव्हारा । दिनु गेलिया काय पंथु आहे । ऐसें जाणोनियां वेगी ठाकी लवलाहे । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे पाय रया ॥४॥