भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोर वैकुंठींची

janv nahin dekhili pandhari | tonvari varnisi thor vaikunthinchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥ मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥२॥ नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥३॥ सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रम्ह तें केवळ नांदतसे ॥४॥ तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरी ॥५॥