भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां

janoni nenaten karin majhen man | tujhi premakhun deuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नाचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥ तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥४॥