भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनि नेणपण अंगी बाणले

janoni nenapan angi banale

जाणोनि नेणपण अंगी बाणले । नेणोनियां जाणपण सहज नेणवलें वो माय ॥१॥ आत्मज्ञानाची गति जाली वो निवांत । प्रबोधतत्त्व मी पावलें वो माय ॥२॥ पाचारिलें अवस्था स्वभावें जाहल्या । म्हणोनि विसरल्या देहभाव माय ॥३॥ गुरुमुखें जै जोडे तें फ़िटे सांकडे । रखुमादेविवर कोडें कवतिके वो माय ॥४॥