भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें

janon gelyen tanv jananen rahilen

जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें । पाहो गेलिये तंव तेंचि जालेंगे माये । इंद्रियांसहित चित्त ठकलेंचि ठेलें । मी माझें विसरलें स्वयें भाव ॥१॥ ऐकोनि देखोनि मन होय आंधळे । परतोनि मावळे नाहीं तेथें ॥२॥ अविद्या निरसली माया तुटली । त्रिगुण साउली तेथें रुप कैचें । चांग विचारीलें विवेकें उगवलें । ज्ञान हारपलें तयामाजी ॥३॥ मुकियाचे परी आनंदु भीतरी । अमृत जिव्हारीं गोड लागे । बापरखुमादेविवरु विठ्ठलु जाणे । संत ये खुणें संतोषलें ॥४॥