भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले

janmantarin shuddha nahin acharan | yalagin charan antarale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥ वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥ पतितपावन ब्रिद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥२॥ अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥३॥ कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें झालें देवा ॥४॥ हा ना तोसा ठाव झाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥५॥ आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका म्हणे ॥६॥