भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा

janmanche sakaden nahin majhe koden | jennen tumhan pade vojhen deva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥ कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥ कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥ चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥